शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही, वेळ पडल्यास सत्तेला लाथ मारेन!

संग्रहित फोटो

कोल्हापूर | गरज पडल्यास सत्तेला लाथ मारून जनतेसोबत येईन पण शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही, असं वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. शिनोळीमध्ये शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

किटकनाशक फवारणारा शेतकरीच किटकनाशकांचा बळी पडतो आहे. कर्जमुक्ती फक्त कागदावरच आहे. शेतकऱ्याची फसवणूक होऊ देणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

‘शरद पवार आणि मुख्यमंत्री बंद दरवाजाआड चर्चा करतात आणि चर्चेबद्दल विचारल्यास क्रिकेटची चर्चा म्हणून सांगतात. मेलं ते क्रिकेट. शेतकऱ्याचं काय होणार याचा विचार करा.’, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला