बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धवजी, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा- अतुल भातखळकर

मुंबई |यंदाही करोनाच्या संकटामुळे आषाढी वारी रद्द करण्यात आली. मोजक्याच दिंड्यांना परवानगी देण्यात आली. या दिंड्या बसमधूनच पंढरपुरात दाखल होणार आहेत. मात्र या निर्णयावर भाजपकडून टीका करण्यात आली.

सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी रद्द करण्यात आल्यामुळे वारकरी नाराज झाले आहेत. तसेच सरकारच्या या निर्णयावरून विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधायला सुरूवात केली आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारी कार्यक्रम धूमधडाक्यात साजरे करणाऱ्या खंडणी सरकारने आषाढी एकादशीच्या वारीवर मात्र बंदी घातली, असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात अतुल भातखलकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा. म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

भातखळकर यांनी यासोबत मागिल वर्षीच्या एका बातमीचाही फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी म्हटलं होतं. त्यावर वारकऱ्यांनी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचाच अभिषेक करावा अशी टीका केली होती.

 


थोडक्यात बातम्या-

“ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मामु मोठा चतुर आहे, हे विसरू नका”

‘आम्हाला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ’; मुख्यमंत्र्यांचे काँग्रेस नेत्यांना चिमटे

मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक; ‘हे’ मोठे निर्णय घेण्याची शक्यता

संजय राऊतांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं- नाना पटोले

पुलवामात सुरक्षा दलाला मोठं यश; लश्कर ए तोयबचे तीन अतिरेकी ठार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More