देशात मोदींना दुसरा पर्याय नाही म्हणूनच आम्ही युती केली- आदित्य ठाकरे

नाशिक | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सध्या तरी दुसरा कोणताही पर्यात नाही. हे विचारात घेऊन युती केली आहे, असं प्रतिपादन युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी नाशिक शहर येथे सभा आयोजित करण्यात आली होते. यावेळी ते बोलत होते.

आघाडीची पंधरा वर्ष भ्रष्टाचारामुळे वाया गेली. तर भाजपची पाच वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीची पापे धुण्यात गेली, असं त्यांनी म्हटलं आहे.

भाजप-शिवसेना साडे चार वर्ष भांडली हे खरे आहे. परंतु युती करणे आवश्यक होतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-“कर्जतचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी निर्णय घेण्याची धमक आम्ही दाखवली”

-जरा काँग्रेसचंही दाखवा; चंद्रकांत पाटलांचं राज ठाकरेंना चॅलेंज

-राज ठाकरेंच्या दणक्यानंतर सरकार नमलं! तावडे म्हणाले सगळं व्यवस्थित करू!

-…तर हिंदुस्तान राहिलाच नसता!- फारुख अब्दुल्ला

-दत्तक मुलीने प्रियकराच्या मदतीने आई बापाचा गळा घोटला