शिवसेनेला पटकणारा पैदा झाला नाही आणि पैदा होणारही नाही- उद्धव ठाकरे

मुंबई | शिवसेनेला पटकणारा अजून पैदा झाला नाही आणि पैदा होणारही नाही, असं म्हणत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या अधिवेशनात ते बोलत होते.

जनतेचा विश्वास ज्याने गमावला त्याला युद्ध जिंकणे कठीण आहे. मग पानिपतचं युद्ध असो की दुसरं कोणतं युद्ध असो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

काही जण छत्रपतींच्या नावाने खोटं बोलत आहेत. शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी देण्यात आली, असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

कमकुवत सरकार असूनही अटलबिहारी वाजपेयींनी कारगील युद्ध जिंकून दाखवलं होतं, मग मजबुत सरकारच हवं असं का म्हणता?, असा सवाल त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-विष्णुचा अवतार राम मंदिर बांधू शकत नाही- उद्धव ठाकरे

-लाट कसली लाट, लाटेची लावू वाट; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

-डाॅ. डी वाय पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर शरद पवार म्हणतात…!

-मुन्नाभाई एमबीबीएस मधील ‘हा’ अभिनेता तीन वर्षांपासून बेपत्ता

-‘द अ‌ॅक्सिडेंटल प्राइम’ मिनिस्टर पाहणार की ‘ठाकरे’??? शरद पवार म्हणतात….