पुणे | आम्ही जनतेला खोटी आश्वासनं देणार नाही. लोकांच्या कल्याणासाठी जे शक्य आहे ते आम्ही करु. जे शिवसेना करू शकेल तेच बोलते आणि बोलते ते करून दाखवते म्हणून तिला शिवसेना म्हणतात, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जुन्नर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार शरद भिमाजी सोनवणे यांच्या प्रचारार्थ नारायणगाव येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले.
शेतकऱ्यांना कर्जमुक्त आपण करणारच आहोत, पण जो साधासुधा शेतकरी आहे त्यांच्या खात्यात दरवर्षी 10000 रुपये देणारी योजना मी अमलात आणल्याशिवाय राहणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
चांगल्या योजना घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत आणि गेल्या 5 वर्षांत आम्ही जनतेला चांगल्या योजना दिल्या आहेत. त्यामुळे युतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रचंड बहुमताने विजयी होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्या राम कदमांना शुभेच्छा! https://t.co/DBxprV3vqe @ShivSena @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 11, 2019
“पवारांना पाटील कधीच कळले नाही, चेहऱ्यावर भाव न आणता फटका लगावतात” – https://t.co/ymsQGpRnRI @ChDadaPatil @PawarSpeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 11, 2019
जेलवारी केलेले गुजरातचे एक भले ‘मोठे’ गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत- शरद पवार https://t.co/oNKfq5dAN0 @NCPspeaks @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 11, 2019
Comments are closed.