अखेर उद्धव ठाकरेंनी त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची माफी मागितली

उस्मानाबाद | काही दिवसांपूर्वी दिलीप ढवळे या शेतकऱ्याने उस्मानाबादचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि उद्धव ठाकरेंचा उल्लेख चिठ्ठीमध्ये करत आत्महत्या केली होती. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादमधील सभेत भाष्य केलं आहे.

ते माझ्या भेटीला आले आणि भेट झाली नसेल तर मी त्यांची माफी मागतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शेतकरी दिलीप ढवळे यांच्या आत्महत्तेवर प्रायश्चित केलं आहे.

या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी केली जाईल. तसेच दोषींना फाशीवर लटकवलं जाईल, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.

दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्याचं चिठ्ठीमध्ये लिहून दिलीप ढवळे यांनी आत्महत्या केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

-औरंगाबादच्या ‘या’ बंडखोर आमदाराने दिला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

-‘यापुढे असं बोलायचं नाही’; भरसभेत शरद पवारांची अमरसिंह पंडितांना ताकीद

-प्रणिती शिंदेचा थेट प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोल!

-भाजप प्रणीत एनडीए सरकारला 350 जागा मिळतील; रामदास आठवलेंचा दावा

-नाशिकच्या युवकांनी गिरीश महाजनांना पाठवला झंडु बाम आणि मलम!