उद्धव ठाकरेंनी शिवसेना नरेंद्र मोदींना विकली; संदीप देशपांडेंची टीका

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदींना विकली आहे, ते शिवसैनिकांनी आधी पाहावं, आमच्या पक्षाचं आम्ही पाहून घेऊ, असं म्हणत मनसेचे प्रवक्ते संदिप देशपांडे यांनी बोचरी टीका केली आहे.

बाळासाहेबांनी राज ठाकरेंना पक्षप्रमुख केलं असतं तर त्यांनी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीला विकली असती अशी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. यावर देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला मदत केली होती याची मार्मिक मधील पोस्ट मनसेने आपल्या अकाउंटवरुन शेअर केली आहे.

पटक देंगे म्हणणाऱ्या अमित शहांसोबत तुम्ही जाणार का, असा सवालही त्यांनी शिवसैनिकांना केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-भाजपचा उमेदवार म्हणतो, ‘मी नक्की पराभूत होणार’!

-मोदी म्हणतात 5 सेकंदात 7 संडास बांधले; यांच्या थापांना सुमारच नाही-राज ठाकरे

-मला ओटीत घ्या, ही माझ्या इज्जतीची निवडणूक- धनंजय मुंडे

-“शहिदांच्या नावे लोकांना मतं मागणं म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार”

-…म्हणून असदुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये 4 दिवस ठाण मांडणार