बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

56 काय 156 पक्ष जरी एकत्र आलात तरी भगवा फडकणारच- उद्धव ठाकरे

यवतमाळ | तुम्ही 56 काय 156 पक्ष जरी एकत्र आलात ना तरी भगवा फडकणारच, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ते यवतमाळमध्ये प्रचारसभेत बोलत होते.

विरोधी पक्षाच्या फुग्याला खूप भोकं पडली आहेत. त्यामुळे आता हा फुगा फुगणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी आघाडीवर केलीय.

काँग्रेस, राष्ट्रवादीला जाहीरात करायला लाज नाही का वाटली ? मला त्या जाहिराती वाचत असताना देखील लाज वाटत असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षावर केलाय. 

दरम्यान, ‘ठाकरे-ठाकरे’मध्ये खूप फरक आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत, असा टोला उद्धव ठाकरेंनी यवतमाळ मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांना लगावला. 

महत्वाच्या बातम्या-

-“नेत्यांच्या निधनानंतर जशी सहानुभूतीची लाट येते, तशी शेतकऱ्यांचा आत्महत्येनंतर का नाही?”

नरेंद्र मोदी हे केवळ संकट नव्हे तर राष्ट्रीय आपत्ती- शरद पवार

-युद्धात व निवडणुकांत सगळे गुन्हे माफ असतात- उद्धव ठाकरे

-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे ‘नातू चलाव पार्टी’- सुजय विखे

-भाजपच्या जाहीरनाम्यातून 10 चेहरे गायब, उरला फक्त एकच चेहरा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More