नरेंद्र मोदींनंतर आता उद्धव ठाकरेंनी केलं शरद पवारांना लक्ष्य!

उस्मानाबाद | काँग्रेस सोडली तेव्हा डांबर फासेन पण पुन्हा काँग्रेससोबत जाणार नाही असं पवारांनी म्हटलं होत. पण पवारसाहेब आता काय झालं? असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना लगावला आहे.

उस्मानाबादचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी पवारांवर तोफ डागली आहे.

शरद पवारांनी काँग्रेस सोडली होती तेव्हा डांबर फासेन पण परत काँग्रेससोबत जाणार नाही असं म्हटलं होत. याच वक्तव्याचा धागा पकडून उद्धव ठाकरेंनी पवारांवर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

राणेंसोबत शिवसेना सोडली हा आमचा मुर्खपणा; माजी आमदाराची खंत

-“राष्ट्रवादीचे 10 पेक्षा जास्त खासदार निवडून आल्यास शरद पवार पंतप्रधान होतील”

-देशाची राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं नाही; धनंजय मुंडेंचा पंकजांवर निशाणा

-पाण्यावरुन राजकारण करणाऱ्यांनो पुणेकर तुम्हाला नक्कीच पाण्यात बुडवणार- गिरीश बापट

-अमरावतीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे!