देश

‘2024च्या आधी पुन्हा पुलवामा हल्ला होईल’; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते उदित राज यांनी पुलवामा हल्ल्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांच्या पुलवामा हल्ल्याबाबतच्या वक्तव्याचं समर्थन करताना उदित राज यांनी 2024 पूर्वी पुन्हा एकदा पुलवामा हल्ला होऊ शकतो. त्यामुळे राहुल यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये तथ्य आहे, असं म्हटलं आहे.

आज आपण पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहत आहोत. पण या सोबतच या हल्ल्यामुळे सर्वात जास्त फायदा कुणाचा झाला? या हल्ल्यासंदर्भातील चौकशीतून काय समोर आलं?, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

सोशल मीडियावर राष्ट्रवादाचा प्रचार करणारे बहुतांश लोक हे उच्चवर्णीय समाजाचे असतात. पण ज्या सैनिकांनी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती लागली ते दलित, आदिवासी आणि मागासवर्गील समाजातील आहेत, असं वादग्रस्त ट्विट उदित राज यांनी केलं आहे.

दरम्यान, उदित राज यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

शांततेच्या मार्गानं सीएएला विरोध करणारे देशद्रोही होत नाही- हाय कोर्ट

राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

महत्वाच्या बातम्या- 

“यूट्यूब चॅनेलवाले काड्या करतात, यांनीच मला संपवण्याचा प्रयत्न केला”

कोणाची रात्र सजवून मी अभिनेत्री झाले नाही- तनुश्री दत्ता

आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं किर्तन सोडून शेती करणार- इंदुरीकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या