Top News

“मंगळावर जाणारे सॅटेलाइट नियंत्रित होऊ शकतात तर ईव्हीएम मशीन का हॅक होऊ शकत नाही?”

नवी दिल्ली | बिहार विधानसभा निवडणुकीतील निकलामध्ये भाजपने आघाडी घेतली. यावर काँग्रेस नेते डॉ. उदित राज यांनी भाष्य केलं आहे.

चंद्र आणि मंगळ ग्रहावर जाणाऱ्या सॅटेलाइटला पृथ्वीवरून नियंत्रित केलं जाऊ शकतं तर ईव्हीएम मशीन का हॅक केल्या जाऊ शकत नाहीत, असा सवाल काँग्रेस नेते डॉ. उदित राज यांनी केला आहे.

अमेरिकेत ईव्हीएम मशीन असत्या तर डोनाल्ड ट्रम्प निवडणूक हरले असते काय?, असा सवाल उदित राज यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

दरम्यान, बिहार विधानसभेच्या 40 जागांवर उमेदवारांमध्ये केवळ 1000 मतांचा फरक आहे. काही जागांवर हा फरक 500 मतांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये महागठबंधन पुन्हा आघाडीवर येईल, असा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

“एनडीए आघाडीवर दिसत असली तरी येत्या काही तासांमध्ये हे चित्र पुन्हा पालटू शकतं”

“राहुल गांधी यांनी ज्यांच्यासोबत हात मिळवले ते डुबले”

“अर्णब भारतीय प्रसारमाध्यमांचा मंडेला होईल, महात्मा गांधींप्रमाणेच अर्णबला त्रास दिला जातोय”

“लालू यादव आणि काँग्रेसचं गुंडाराज बिहारच्या जनतेने नाकारलंय”

“भाजप दिवाळी साजरी करत नाही, तर जनतेला दिवाळखोरीत काढतं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या