बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हे आमदार, खासदार सो कॉल्ड जी माकडं आहेत…’, उद्यनराजे संतापले

सातारा | उद्यनराजे यांनी एका बैठकीत सातारा क्रिडा संकुलच्या बाबतीत संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. सातारच्या क्रिडा संकुलाचं वाटोळं करणाऱ्याचं मुस्काड फोडलं पाहीजे, असं ते म्हणाले आहेत. याशिवाय इतरही अनेक मुद्द्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

त्यांनी यावेळी चूकीच्या पद्धतीने हे संकुल उभारलं असल्याचा आरोपही केला आहे. ते म्हणाले.”त्याकाळी रणजी ट्रॉफी शाहू स्टेडीयमवर भरवल्या जात होत्या. रणजीही झाल्या. सातारा प्राईम एरीया आहे. स्टॅंडच्या शेजारी आहे. एवढं असतानाही संकुल उभारलं गेलं नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

याशिवाय ते म्हणाले, “बी.जी. शिर्केंनी बालेवाडीचं स्टेडीयम कॉमन वेल्थसाठी बांधलं होतं. त्यांंनी आपल्या संकुलासाठी निघालेल्या टेंडरचा फॉर्म भरला होता”, असं सांगून ते पुढे म्हणाले,”हे यासाठी सांगतोय हे मीडियात आलं पाहिजे. ही आमदार, खासदार ही जी सो कॉल्ड माकडं आहेत. त्यांनी यातून बोध घ्यायला पाहिजे.”असं खडसावलं आहे.

उद्यनराजेंच्या या प्रतिक्रियेनंतर उद्यनराजेंनी अजित पवार यांच्यावरच अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची चर्चा संध्या रंगली आहे. दरम्यान नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी दिलेल्या या संतप्त प्रतिक्रियामुळेही राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘आर्यन खानला गांजा दिला होता, पण….’, अनन्या पांडेचा मोठा खुलासा

‘…ते आपल्याला मोडून काढायचं आहे’, मुख्यमंत्र्यांचा ‘हा’ महत्त्वाचा निर्धार

देशातील कोरोना रूग्णसंख्येतील चढउतार सुरूच, पाहा गेल्या 24 तासातील आकडेवारी

एसटी प्रवास महागणार, इंधन दरवाढीचा आता प्रवाशांनाही बसणार मोठा फटका

शेतकऱ्यांची धाकधुक पुन्हा वाढणार?; हवामान विभागाचा ‘या’ भागात पावसाचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More