उदयनराजे आणि चंद्रकांत पाटील यांचा एकत्र प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकत्र प्रवास केला. या प्रवासामुळे राजकीय वर्तुऴात चर्चांना उधाण आलं आहे.

आज रस्त्याच्या भुमिपुजन कार्यक्रमाच्या निमीत्ताने चंद्रकांतदादा पाटील साता-यात आले होते. यावेळी  खा.छत्रपती  उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले हे दोन्ही राष्ट्रवादीचे नेते या कार्यक्रमास उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि महसूलमंत्री मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एकाच गाडीतुन प्रवास केला, त्यामुळे वेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.

दरम्यान,सध्या घडणाऱ्या घडामोडीवरून राष्ट्रवादी उदयनराजेवर नाराज असल्याचं बोललं जातंय, त्यामुळे उदयनराजेंना भाजपमध्ये सामील करून घेण्यासाठी भाजपच्यावतीने जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-खेळला बाबा एकदाचा रायडू; मुंबई वनडेत रोहितसोबत झळकावलं शतक

-काँग्रेस- शिवसेनेच्या आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की!

-दिवाळीआधीच रोहित-रायुडूची आतषबाजी; वेस्ट इंडिजपुढे 378 धावांचं आव्हान

-हिंमत असेल तर राम मंदिराचा अध्यादेश आणून दाखवाच- असदुद्दीन ओवेसी

-रोहितची शतकी खेळी; तर रायुडूचंही अर्धशतक

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या