Top News विधानसभा निवडणूक 2019

उदयनराजे भोसलेंनी कराडमध्ये जाऊन मागितली जाहीर माफी!

मुंबई |  लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी कराडमध्ये जाऊन मुस्लिम समाजाची माफी मागितली आहे.लोकसभा निवडणुकीवेळी भाजप जिल्हाध्यक्षाने कराडमधील प्रचारसभेत मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे उदयनराजे भोसले यांनी माफी मागितली आहे.

मी जर त्यावेळी त्या प्रचारसभेला उपस्थित असतो तर त्या जिल्हाध्यक्षाला मंचावरून खाली खेचलं असतं, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

माफी मागताना सुद्धा लाज वाटते. जे मी केलं नाही, दुसऱ्याने केलं, तरीही मी माफी मागतो. त्यांचा मतितार्थ एवढाचं की समाज एकत्र राहायला नको. मोठेपणाने बोलतात.  भाजप जिल्हाध्यक्ष माझ्या प्रचारात नव्हते, सांगता सभेत त्यांनी माझ्या प्रचारात येऊन सर्व कामावार विरजण टाकलं. मी त्या सभेत असतो तर सभेतून खाली खेचलं असतं, असं उदयनराजे आज कराडमध्ये बोलताना म्हणाले.

भाजपची साताऱ्याची सांगता सभा कराडमध्ये झाली होती. यावेळी भाजप जिल्हाध्यक्षाने, काँग्रेस-राष्ट्रवादीला मतं देऊ नका, भाजपला द्या, असं आवाहन करताना मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या