तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार??? उदयनराजेंनी नेहमीच्या अंदाजात उत्तर दिलं…!

उस्नानाबाद |  आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा खासदार उदयनराजे भोसले असू शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यावरच साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्रीपद माझ्यापुढे गौण आहे. मी त्या पदांना किंमत देत नाही, असं नेहमीच्या शैलीत त्यांनी उत्तर देऊन होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला.

उदयनराजे भोसले तुळजापूरला तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, उदयनराजेंनी मुख्यमंत्रीपदात आपल्याला रस नाही असं जरी म्हटलं असलं तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी त्यांच्या नावाची चर्चा केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल

-राजकारणात कुणीही पर्मनंट नसतं; लोकांनी अनेक दिग्गजांना घरी बसवलंय- फडणवीस

-राष्ट्रवादीचं माझ्याकडे कोणतही पद नाहीये पण मान आणि सन्मान आहे- छगन भुजबळ

-दिशाबाबत विचारताच आदित्य ठाकरे लाजले!

-माढ्याच्या खासदारांनी घेतली उदयनराजेंची भेट; राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या