“देशात आज राजेशाही असती तर मी दुष्काळ निवारणाचा निर्णय घेऊन मोकळा झालो असतो”

सोलापूर | देशात लोकशाही आहे. राजेशाही असती तर मी कधीच दुष्काळ निवारणाचा निर्णय घेऊन रिकामा झालो असतो, असं मत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. ते राज्यातील दुष्काळाचं संकट दूर व्हावं यासाठी पंढरपूरात विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी गेले होते.

आज राजेशाही अस्तित्वात असती तर दुष्काळ निवारणाचा मी निश्चित निर्णय घेतला असता. दुष्काळावर चर्चा करण्याची वेळ देखील येऊ दिली नसती, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

ज्या तालुक्याचं आरक्षित पाणी आहे त्या तालुक्याला ते मिळालंच पाहिजे. पाण्यावरून राजकारण करणं चूकीचं आहे, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शेतकरी दुष्काळात होरपळून जात आहे. शेतकऱ्याला वाचवण्याची जबाबदारी लोकशाहीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची आहे, असंही उदयनराजे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-रोहित पवार यांच्या उमेदवारीला विरोध; यांना उमेदवारी देण्याची मागणी!

आरक्षणामुळे लोकशाही संपुष्टात येत आहे- उदयनराजे भोसले

-गुन्हा दाखल झाल्यावर आणि कोर्टाने दिलासा दिल्यावर धनंजय मुंडेंचं आक्रमक ट्वीट

-‘या’ नेत्याला तूर्तास मंत्री करू नका; अमित शहांच्या मुख्यमंत्र्यांना सुचना

-शिवानी सुर्वे का संतापते??? तिच्या बॉयफ्रेंडने सांगितलं कारण…