आरक्षणामुळे लोकशाही संपुष्टात येत आहे- उदयनराजे भोसले

सोलापूर |  आरक्षणामुळे जाती-धर्मांमध्ये भांडणं लागली आहेत. आरक्षणामुळे लोकशाही संपुष्टात येत आहे. सगळे आरक्षण रद्द करून टाका. उगाच शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सर्वधर्म समभावाची शिकवण देऊ नका, असं वक्तव्य साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

लिंगायत, मराठा, मुस्लिम समाजातील नागरिकांना आरक्षण लागू करा नाहीतर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असं ते म्हणाले.

लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर इव्हीएम तोडा आणि माणसे जोडा, अशी भूमिकाही उदयनराजे यांनी मांडली.

दरम्यान, आरक्षणामुळे लोकशाही संपुष्टात येत आहे, या उदयनराजेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-गुन्हा दाखल झाल्यावर आणि कोर्टाने दिलासा दिल्यावर धनंजय मुंडेंचं आक्रमक ट्वीट

-‘या’ नेत्याला तूर्तास मंत्री करू नका; अमित शहांच्या मुख्यमंत्र्यांना सुचना

-शिवानी सुर्वे का संतापते??? तिच्या बॉयफ्रेंडने सांगितलं कारण…

-विखेंना शह; काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरातांची निवड

-हे शंकरा पाव रे…! आमच्या साहेबांना मंत्रीपद मिळू दे; ‘या’ आमदाराच्या समर्थकांचं देवाला साकडं