महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

नाशिकच्या सभेतील उदयनराजेंचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Loading...

मुंबई | भाजपची नाशिकमधील महाजनादेश यात्रेची सांगता सभा मोठ्या जल्लोषात पार पडली, मात्र याच सभेसंदर्भातील वाद आता सोशल मीडियावर सुरु आहे. खासदार उदयनराजे यांच्यासंदर्भातील हा वाद आहे.

खासदार उदयनराजे यांचा या सभेतील एक फोटो व्हारल होतोय. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सन्मान होताना दिसतोय. त्यांना हार घातला जातोय, तर दुसरीकडे उदयनराजे मागे उभं असल्याचं दिसतंय.

Loading...

याच फोटोचा धागा पकडून उदयनराजेंचा अपमान झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर पडू लागल्या आहेत. राष्ट्रवादीत असताना त्यांचा कसा सन्मान केला जायचा याचा एक फोटो देखील यासोबत व्हायरल केला जात आहे.

दरम्यान, नाशिकच्या याच सभेत उदयनराजेंना मोदींना सत्कार करण्याची संधी देण्यात आली होती. त्यांनी शाही पगडी घालून मोदींचा सत्कार केला होता.

Loading...

 

 

Loading...

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या