बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोकशाहीत सर्वजण समान, स्वत:ला ‘वंचित’ समजतात ते बुझदिल- उदयनराजे भोसले

सातारा |  लोकशाहीत सर्वजण समान असतात. त्यामुळे येथे कोणीही वंचित नाही. आणि जो स्वत:ला वंचित म्हणतो तो बुझदिल आहे, असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली आहे.

साताऱ्यात जय भीम फेस्टिवल सुरु आहे. यावेळी कार्यक्रमाचे उद्धाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. यावेळी ते बोलत होते.

वंचितचा नेमका अर्थ काय? मला हा प्रश्न पडतोय. लोकशाहीत कोणी कोणाला वंचित ठेवत नसतो. केवळ राजकारणासाठी त्याचा दुरुपयोग केला जातो, असं ते म्हणाले आहेत.

या देशात कोणीही वंचित राहू नये. कोणाच्याही अधिकारावर गदा आणण्याचा कोणालाही अधिकार नाही, असंही उदयनराजे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-वाराणसीतील मोदींच्या विजयासाठी गुंडांकडून स्थानिकांना धमकावलं जातंय; मायावतींचा आरोप

-अजय देवगणने सांगितलं तब्बूच्या लग्न न करण्यामागचं कारण

-पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढला

-कमल हसन यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणतात…

-भाजप नेत्याने केली राजीव गांधींची नथूराम गोडसेसोबत तुलना

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More