मला ‘वंचित’ हा शब्दच आवडत नाही- उदयनराजे भोसले

सोलापूर | मला ‘वंचित’ हा शब्दच आवडत नाही, असं राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. ते सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

ज्यांनी तुम्हाला तुमच्या अधिकारांपासून वंचित ठेवलं आहे. त्यांना बाजूला काढून वंचित ठेवा, असा टोला उदयनराजे भोसलेंनी लगावला आहे.

वंचित बहुजन आघाडीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उदयनराजेंनी त्यांच्या शैलीत उत्तर देत मला वंचित शब्दच आवडत नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, मला सत्तेची खाज नाही. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, असं म्हणत उदयनराजेंनी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-गुन्हा रद्द झालेला नाही; धनंजय मुंडेंनी दिशाभूल करू नये- राजाभाऊ फड

-बिहार सरकारने वृद्धांसाठी केली ‘या’ नव्या पेन्शन योजनेची घोषणा

-डॉक्टरांनी उपचारास नकार दिल्याने नवजात बाळाचा मृत्यू

-रामराजेंकडून उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना

-“देशात आज राजेशाही असती तर मी दुष्काळ निवारणाचा निर्णय घेऊन मोकळा झालो असतो”