मुंबई | शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हाॅटेल आणि लग्न समारंभासाठी भाड्याने देण्याच्या सरकारच्या धोरणावर सर्व राज्यातून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. मात्र, भाजप नेते आणि शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी सरकारच्या या धोरणाला पाठिंबा दिला आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
किल्ल्यांवरील मंदिरांमध्ये लग्नसोहळे व्हावे, अशी सरकारची योजना आहे. आपल्याकडे देवळात लग्न करण्याची परंपराच आहे. त्यामुळे गडकिल्ल्यातील देवळे लग्न समारंभासाठी देण्यात गैर काय? असा सवालही उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे.
पर्यटनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने देण्यात गैर नाही. उलट त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाढेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेले गडकिल्ले हॉटेल व लग्न समारंभासाठी सरकार भाड्याने देणार आहे. याअंतर्गत 25 गडकिल्ल्यांची निवडही करण्यात आली आहे. मात्र, याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी पुण्यातील SP कॉलेजच्या मैदानातील झाडांची कत्तल https://t.co/02WdB8TP6q @narendramodi @BJP4Maharashtra #AssemblyElections2019
— थोडक्यात (@thodkyaat) October 15, 2019
“आमचा दादा एक दिवस तुम्हाला बारामतीमध्येच लोळवेल” https://t.co/ZinFn790Ur @ShelarAshish @ChDadaPatil @AjitPawarSpeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 15, 2019
पाच वर्षाच्या शेंबड्या पोरालाही माहितीय युतीचं सरकार येईल- देवेंद्र फडणवीस https://t.co/lWGjR5F3V7 @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— थोडक्यात (@thodkyaat) October 15, 2019
Comments are closed.