तुम्हाला देव माफ करणार नाही; पाणी प्रश्नावरून उदयराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

तुम्हाला देव माफ करणार नाही; पाणी प्रश्नावरून उदयराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

सातारा |  स्वत:ला भगीरथ म्हणवून घेणाऱ्या व्यक्तींनी 14 वर्ष अध्यादेश का काढला नाही? देव तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असं म्हणत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजे निंबाळकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

गुरूवारी त्यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नीरा देवघरच्या पाणी प्रश्नावरून  राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला.

राज्य सरकारने नीरा डाव्या कालव्याचं बारामतीचं जाणारं नियमबाह्य पाणी वळवून दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय घेतला आहे. यावरच उदयनराजेंनी भाष्य केलं.

दरम्यान, दुष्काळी भागाला पाणी देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गुरूवारी उदयनराजेंची भेट घेतली.

महत्वाच्या बातम्या

-…तर मी भाजप प्रदेशाध्यक्षपद स्विकारायला तयार- चंद्रकांत पाटील

-खासदार डाॅ. सुजय विखेंकडून राजशिष्टाचाराचा भंग

-राष्ट्रवादी युवकच्या जिल्हा प्रभाऱ्यांची नियुक्ती; पाहा कुणाला मिळाली संधी

-“आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होणार असतील तर पक्षातलं आमचं स्थान काय???”

-राज ठाकरेंच्या वाढदिवसाला राष्ट्रवादीने दिल्या शुभेच्छा….

Google+ Linkedin