पुणे महाराष्ट्र

“राज्याचा खेळखंडोबा केलाय, हे दिवस बघण्यापेक्षा मेलेलं बरं”

पुणे | राज्याचा खेळखंडोबा केलाय, हे दिवस बघण्यापेक्षा मेलेलं बरं, असं छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकासआघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

शिवसेना जेव्हा काढली त्याला नाव दिलं तेव्हा तुम्ही वंशजाना विचारायला आला होता का महाशिवआघाडी नाव ठेवलं तेव्हा विचारलं का? शिव का काढून टाकलं? सोईप्रमाणे हे लोक वापर करतात, ही यांची लायकी, असा घणाघात उदयनराजेेंनी केला आहे.

Loading...

शिवसेना भवनावर महाराजांची मूर्ती खाली, वरती फोटो कुणाचा पाहा, वंशज म्हणून तुम्ही आमच्यासारख्यांवर टीका करता, शिवाजी महाराजांनी दिलेली आम्ही शिकवण पाळतो, निवडून येऊनही मी राजीनामा दिला, जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी करत नाही, असं उदयनराजे म्हणाले आहेत.

दरम्यान, जाणता राजा म्हणून अलिकडे उपमा दिल्या जातात. मात्र जाणता राजा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

 

 

Loading...

 

Loading...

ताज्या बातम्या