पुणे महाराष्ट्र

शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो शिवरायांच्या वर का?- उदयनराजे भोसले

पुणे | देशभरात जय भगवान गोयल यांच्या आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय होते. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. तसंच शिवसेना भवनावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो खाली का? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला आहे.

Loading...

शिवसेना जेव्हा काढली त्याला नाव दिलं तेव्हा तुम्ही वंशजाना विचारायला आला होता का? महाशिवआघाडी नाव ठेवलं तेव्हा विचारलं का? शिव का काढून टाकलं? सोईप्रमाणे हे लोक वापर करतात, ही यांची लायकी, असा घणाघात उदयनराजेेंनी केला आहे.

दरम्यान, मी कधी राजकारण केलं नाही करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोण्याबरोबरही केली जाते याचं वाईट वाटतं. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का ते कळत नाही, असंही उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

 

 

Loading...

 

Loading...

ताज्या बातम्या