भगवा ड्रेस आणि ‘बेशरम रंग’ वर डान्स, उर्फीचा व्हिडीओ नेमका कोणासाठी?
मुंबई | सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Jawed) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचे अतरंगी कपडे नाही पण थेट भाजप (BJP) नेत्याशी भिडल्याने उर्फी जावेद पुन्हा प्रकाशझोतात आली.
भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उर्फी जावेदमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीवर खुलेआम नंगटपणा केल्याचा आरोप करत थेट पोलिस तक्रार दाखल केली.
चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर उर्फीनेही जशास तसं उत्तर दिलं. चित्रा वाघ विरूद्ध उर्फी जावेद वादामुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना उर्फीच्या नवीन व्हिडीओमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्फीने भगव्या रंगाचा एक बोल्ड ड्रेस घातला आहे आणि ती ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशरम रंग’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
उर्फीने पठाण सिनेमातील बेशरम रंग या वादग्रस्त गाण्यावर व्हि़डीओ केल्याने अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केलं आहे. यापूर्वीही बेशरम रंग गाणं आणि यातील दीपिका पादुकोनच्या (Deepika Padukon) भगव्या बिकिनीमुळे वादाला तोंड फुटलं होतं.
दरम्यान, उर्फीच्या या व्हिडीओवर चित्रा वाघ प्रतिक्रिया देणार का? यासोबतच यामुळे आता कोणता नवा वाद निर्माण होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.