बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कॉलेज आणि विद्यापीठात मोदींचे आभार मानणारे फलक लावावेत’; युजीसीकडून विद्यापीठांना निर्देश

नवी दिल्ली |  21 जूनपासून देशात मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन आठवड्यांपुर्वी केली होती. यानुसार 21 जून रोजी देशात 80 लाखांच्यावर रेकॉर्डब्रेक लसीकरणाची नोंद झाली. यामुळे नरेंद्र मोदी यांनी ‘वेल डन इंडिया’ असं ट्वीट करत देशवासियांचे अभिनंदन केलं आहे.

आता विद्यापीठ अनुदान आयोगाने देखील या कार्याची दखल घेत देशातील कॉलेज आणि विद्यापीठांनी मोदींचे आभार मानणारे फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी व्हाट्सअॅपच्या माध्यमातून विद्यापीठांना या सुचना दिल्या आहेत.

देशात 18 आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण चालू करण्यात आले आहे. याबद्दल कॅम्पसमध्ये मोदींचे फलक लावून आभार मानावेत. तसेच मोदींचे आभार व्यक्त करणारे फलक सोशल मिडीयावरील शैक्षणिक संस्थांच्या वेबपेजवर प्रसिद्ध करावेत, अशा सुचना रजनीश जैन यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, लसीकरणाच्या विक्रमानंतर सर्वत्र नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावून अभिनंदन केलं जात आहे. या बॅनरबाजीवरुन विरोधी पक्षातील नेते मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी देखील या मुद्यावरुन मोदींवर टीका केली आहे. मनमोहनसिंग सरकारच्या काळात फेब्रवारी 2012 मध्ये देशात एका दिवसांत रेकॉर्डब्रेक पोलिओ डोस देण्यात आले होते. मात्र, याचे बॅनर झळकविण्यात आले नाहीत, असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“तेव्हाच्या पंतप्रधानांमध्ये आणि सध्याच्या पंतप्रधानांमध्ये ‘हा’ फरक आहे”

‘या’ दिवसापासून सुरू होणार विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन

“बारमध्ये गर्दी चालते, उद्घाटनाला गर्दी मग अधिवेशन का नको?, सरकार आहे की तमाशा”

“महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत”

शिवसेना-भाजप युतीबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य म्हणाले…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More