बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतातील ‘हे’ शहर बनतंय नवं वुहान; मृत्यूदराची आकडेवारी धडकी भरवणारी

जगभरात कोरोनाचं थैमान सुरु असताना भारतातही या आजारानं आपले हातपाय चांगलेच पसरले आहेत. नाही नाही म्हणता म्हणता भारत इतर देशांना मागे टाकत या आजाराच्या रुग्णांच्या वाढीत पुढेच जाताना दिसत आहे. महाराष्ट्रातील पुण्या-मुंबईसोबत इतर राज्यातील शहरांमध्ये देखील या रोगाने चांगलाच कहर चालवला असून तो धक्कादायक आहे, यामध्ये मध्यप्रदेशातील उज्जैन शहराची आकडेवारी सर्वात धक्कादायक आहे.

आतापर्यंत मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूकडे साऱ्या देशाचं लक्ष होतं, मात्र याच शहराच्या बाजूला असलेल्या उज्जैनमध्ये सुरु असलेल्या मृत्यूदरानं सर्वांची झोप उडवली आहे. आतापर्यंत इथं २०४ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यातील तब्बल ४२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

उज्जैनचा मृत्यूदर हा भारतातील इतर कोणत्याही शहरांपेक्षा अधिक धक्कादायक आहे. महाकालची नगरी म्हणून उज्जैनची जगभरात ओळख आहे, मात्र कोरोनानं होत असलेल्या मृत्यूनं या शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शहरात कधी नव्हे इतकी शांतता निर्माण झाली आहे. शहरात होणाऱ्या मृत्यूची चर्चा घराघरात रंगत असून लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

उज्जैनमध्ये सुरु असलेला हा कोरोनाचा कहर मध्य प्रदेश सरकारसाठी देखील धक्कादायक आहे. सरकारने यासंदर्भात कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकाऱ्यासोबतच येथील सीएचओमओची देखील बदली करण्यात आली आहे. आशिष सिंग यांच्याकडे उज्जैनचा कारभार सोपवण्यात आला आहे. उज्जैनमध्ये वाढणारा कोरोनाचा प्रकोप कमी करण्यासाठी कडक पावलं उचलली जाणार असल्याचं आशिष सिंग यांनी स्पष्ट केलं आहे, तसेच कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यावर देखील आमचा भर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

वास्तविक, उज्जैनमध्ये कोरोनामुळे लोक भयभीत का आहेत? यासंदर्भात आकडेवारीकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. आकडेवारीनुसार, १४ एप्रिलपर्यंत उज्जैनमध्ये कोरोनाचे २७ पॉझिटिव्ह रुग्ण होते आणि ६ लोकांचा मृत्यू झाला होता.

यानंतर, ६ मे पर्यंत मृत्यूची संख्या झपाट्याने वाढली आणि मृतांची संख्या ४२ पर्यंत पोहोचली, तर कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २०४ वर पोहोचली. म्हणजेच, केवळ २१ दिवसात उज्जैनमध्ये कोरोनामुळे तब्बल ३६ लोकांचा मृत्यू झाला.

उज्जैनमध्ये कोरोनामुळे झालेला पहिला मृत्यू २५ मार्च रोजी झाला होता आणि ६ मे पर्यंत आपण मृत्यूची आकडेवारी पाहिल्यास हे स्पष्ट होते, की ४३ दिवसांत उज्जैनमध्ये ४२ लोक कोरोनामुळे मरण पावले आहेत. पॉझिटिव्ह रूग्ण आणि मृत्यूची सरासरी पाहिल्यास उज्जैनमधील मृत्यूचे प्रमाण २०.५८ टक्क्यावर पोहोचले आहे. आणि हा धक्कादायक मृत्यूदर आहे.

उज्जैनमधील मृत्यूचे प्रमाण इंदौर आणि भोपाळसारख्या कोरोना हॉटस्पॉटपेक्षा अधिक आहे. ६ मे पर्यंतच्या आरोग्य बुलेटिनच्या मते, इंदौरमध्ये १६८१ कोरोना रुग्णांपैकी ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील मृत्यूचे प्रमाण ८.८१% आहे, तर भोपाळमध्ये कोरोनाच्या ५०५ पैकी २० जण मरण पावले आहेत आणि येथील मृत्यूदर ३.३०% आहे.

आतापर्यंत उज्जैनमध्ये ३७५५ नमुने घेण्यात आले असून ३६८१ अहवाल प्राप्त झाले आहेत. इंदौरनंतर उज्जैनमधील लोकांच्या मृत्यूदराचं वाढतं प्रमाण पाहून काँग्रेस आक्रमक झाली आहे.  मध्य प्रदेश कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जितू पटवारी म्हणतात, की उज्जैनमध्ये बरेच नमुने प्रलंबित आहेत, ज्यांचा अहवाल लवकरच येत आहे. अशा परिस्थितीत सकारात्मक रूग्णांची संख्या आणखी वाढणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

फडणवीस आध्यात्मिक पुस्तकं वाचा, मन:शांती लाभेल- हसन मुश्रीफ

“मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या आमदारांना जनतेने चपलीने मारायला हवं”

महत्वाच्या बातम्या-

बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून भाजपकडून ‘या’ नावाची घोषणा

राज्यात आज 3007 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; पाहा तुमच्या भागात किती?

“एकेकाळी हॉटस्पॉट ठरलेला मालेगाव कोरोनामुक्तीचा पॅटर्न म्हणून समोर येतोय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More