कोपर्डी खटल्याच्या सुनावणीस उशीर हा आरोप खोटा- उज्ज्वल निकम

उज्ज्वल निकम

मुंबई | कोपर्डी खटल्याच्या सुनावणीला उशीर झाला हा आरोप खोटा आणि गैरसमजावर आधारित आहे.  विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हे वक्तव्य केलंय. 

५ महिन्यात आरोपींच्या साक्षी पूर्ण करण्यात आल्या तसेच खटल्याच्या सुनावणीत जो वेळ गेला तो नैसर्गिक असल्याचं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, आरोपींतर्फे करण्यात आलेली बचावाचा साक्षीदार तपासण्याची विनंती न्यायालयाने फेटाळलीय. त्यामुळे यासंदर्भात लवकरच निर्णय येण्याची शक्यता असल्याचं निकम यांनी स्पष्ट केलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या