रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यात युक्रेनचं कोट्यवधींचं नुकसान, ‘ही’ आकडेवारी समोर
कीव | रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) सुरूवात होऊन 34 दिवस उलटले आहेत. रशियाकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यात युक्रेनमधील शहरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. युक्रेनमधील परिस्थिती भयावह असताना दिवसेंदिवस रशियाकडून युक्रेनवरील हल्ले तीव्र केले जात आहेत.
रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यात युक्रेनमधील मारियुपोल शहराचं सर्वात जास्त नुकसान झालं आहे. या हल्ल्यात मारियुपोल शहराचा 90 टक्के भाग उद्ध्वस्त झाला आहे. या शहरावरील हल्ल्यात 5 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिड लाखांपेक्षाही जास्त लोक मारियुपोलमध्ये अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रशियन सैनिकांकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यात युक्रेनचं तब्बल 564.9 बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. रशियाकडून (Russia) होणाऱ्या मिसाईल हल्ल्यांत युक्रेनमधील (Ukraine) तब्बल 7,886 किमीहून अधिक रस्ते उद्धवस्त झाले आहेत. युक्रेनी मंत्री सिव्रीडेन्को यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, युक्रेनने रशियाची क्षेपणास्त्रे तसेच अनेक चिलखती वाहने नष्ट केल्याचा दावा केला आहे. तर रशिया आणि युक्रेनच्या या युद्धात 7 रशियन जनरल मारले गेले असल्याचा दावा देखील युक्रेनकडून करण्यात आला आहे.
थोडक्यात बातम्या-
“भाजपच्या काळ्या जादूचा आमच्यावर प्रभाव पडणार नाही”
“सुशिक्षित हिंदू मुलीच मुस्लिम मुलांना पळवून नेतात”
महाराष्ट्रावर आणखी एक संकट, पुढचे पाच दिवस महत्त्वाचे
नितीन गडकरींचं काँग्रेसबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाले…
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, सलग सहाव्यांदा पेट्रोल महागलं; वाचा ताजे दर
Comments are closed.