रशियन सैनिकांच्या निशाण्यावर युक्रेनच्या महिला; अत्यंत धक्कादायक माहिती समोर
कीव | रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर सैन्य कारवाईचे आदेश दिले. पुतीन यांनी युक्रेनविरोधात लष्करी कारवाईची घोषणा करताच युक्रेनची राजधानी कीव आणि खार्किव भागात स्फोट ऐकू आले.
पुतीन यांच्या निर्णयाने रशिया-युक्रेन वादाला तोंड फुटलं. यादरम्यान रशियन सैनिक टिंडरवर फ्लर्टी मेसेज पाठवत असल्याचा दावा युक्रेनमधील एका महिलेने केला आहे. फ्लर्ट करण्याच्या उद्देशाने रशियन सैनिक मेसेज पाठवत असल्याचा या महिलेचं म्हणणं आहे.
अनेक सैनिकांनी त्यांच्या पदाची माहिती फोटोसह शेअर केली असल्याचंही समोर आलं. युक्रेनमधील महिलेने सांगितलं की, मी एका शत्रुशी कधीही बोलणार नाही. मी टिंडरवर त्यांची रिक्वेस्ट नाकारली पण मेसेज पाठवणारे अनेक असल्याचा खुलासाही त्या महिलेने केला आहे.
दरम्यान, टिंडरवर येणारे मेसेज रशियन सैनिकांचे असल्याचं त्या महिलेने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. रशियन सैन्याचा गणवेश घातलेले अनेकजण अचानक प्रोफाईलमध्ये दिसत असल्याचं युक्रेनमधील महिलेने सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
Russia-Ukraine War | ‘इतके’ हजार भारतीय अडकल्यानं चिंतेचं सावट
रशियाकडून युक्रेन विमानतळावर बॉम्बफेक, लाईव्ह व्हिडीओ आला समोर
Gold Rate: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम थेट सोन्याच्या दरावर, वाचा आजचे ताजे दर
“नवाब मलिकांनी बांग्लादेशातून मुली मुंबईत आणून वेश्याव्यवसाय केला…”
Apple ची बंपर ऑफर; iPhone 13 वर मिळतेय ‘इतक्या’ हजार रुपयांची सूट
Comments are closed.