पुणे | शिंदे गटातील आमदार अपात्र ठरल्यास राज्यात काय परिस्थिती निर्माण होईल, असा प्रश्न सर्वांना पडलाय. यावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी भाष्य केलं. बापट यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
एक तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा देवेंद्र फडणवीसांच्या मागे जर काही कारणाने काही आमदार जाऊन बहुमत निर्माण झालं तर त्यातून नवीन सरकार स्थापन होऊ शकतं. पण तो सगळा राजकीय तर्क-वितर्कांचा भाग आहे, असं उल्हास बापट यांनी सांगितलं आहे. त्यां
इतर प्रकरणांत अपात्र ठरल्यानंतर देखील मंत्री राहता येतं. 6 महिन्यांच्या आत निवडून येता येतं. पण पक्षांतरबंदी कायद्यानुसार जर अपात्र ठरले, तर त्यांना मंत्री राहता येत नाही, असं उल्हास बापट यांनी सांगितलं आहे.
पुन्हा निवडून आल्यानंतरच मंत्री होता येतं. त्यामुळे खूपच कठीण परिस्थिती निर्माण होईल. कारण मुख्यमंत्रीच गेले, तर सरकारच बरखास्त होऊ शकतं, अशी माहिती बापट यांनी दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! नवनीत राणा यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय!
शिवसेनेचा प्रमुख कोण?; रावसाहेब दानवे स्पष्टच बोलले
मोठी बातमी! रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष
कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर
Comments are closed.