मुंबई | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. अशात घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ullhas Bapat) यांनी टीव्ही 9 शी बोलताना निकाल कोणत्या बाजूने लागू शकतो यासंदर्भात अंदाज वर्तवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाल्यापासून आत्तापर्यंत आलेल्या अतीमहत्त्वाच्या प्रकरणांमध्ये या प्रकरणाचा समावेश करावा लागेल. कारण या प्रकरणामुळे भारतीय लोकशाहीची दिशा ठरणार आहे, असं उल्हास बापट म्हणालेत.
राजीव गांधींनी घटनादुरुस्ती करून पक्षांतर बंदी कायदा आणला. राजकीय भ्रष्टाचारातून इतर भ्रष्टाचार निर्माण होतो हे यामागचं लॉजिक आहे. पक्षांतर केलं तर तुम्ही अपात्र व्हाल असा हा कायदा आहे, असं उल्हास बापट म्हणाले.
मला दिसतंय त्यानुसार दोन तृतियांशच्या नियमाच्या आधारावर ते अपात्र ठरले आहेत. जर ते अपात्र ठरले, तर 91 व्या घटनादुरुस्तीने म्हटलंय की त्यांना मंत्री राहता येणार नाही. त्या 16 जणांमध्ये मुख्यमंत्रीही आहेत. जर मुख्यमंत्रीच राहिले नाहीत, तर सरकार पडेल, असं बापट म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
- एकमेकींच्या झिंज्या ओढत पोरींची तुंबळ हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का
- राज्यातील ‘या’ भागात गारपीटीसह मुसळधार पावसाचा इशारा
- कांदा उत्पादकांसाठी एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा!
- ‘हिंदूंच्या घरात दोन मुले असतील तर एकाला…’; धीरेंद्र शास्त्रींचं वक्तव्य चर्चेत