प्रियांका गांधी चोराच्या पत्नी; उमा भारतींचं वादग्रस्त वक्तव्य

लखनऊ | लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहे. यात केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली आहे.

प्रियांका गांधी या चोराच्या पत्नी आहेत आणि जनता त्यांना त्याच नजरेने पाहणार, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.

राॅबर्ट वाड्रा यांच्यावर चोरीचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या बायको असणाऱ्यां प्रियांकाकडे लोक त्याच नजरेने पाहतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींनी दोन जागेवरुन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन आपला पराभव मान्य केला आहे, असं म्हणत त्यांनी राहुल यांच्यावरही निशाणा साधला.

महत्त्वाच्या बातम्या

-…म्हणून मी मुंडे भगिणींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे- छत्रपती संभाजीराजे

शरद पवार म्हणाले माढ्यात लढतो…पण जनता म्हणाली सॉरी पवार साहेब- देवेंद्र फडणवीस

राहुल गांधीनी माझी जात काढली; हा संपूर्ण मागास जातीचा अपमान-नरेंद्र मोदी

जाणते राजे कृषिमंत्री असून काही केलं नाही; फडणवीस-मोदींची पवारांवर सडकून टीका

-मी मागास जातीचा असल्याने माझ्यावर हल्ला; मोदींचा विरोधकांवर गंभीर आरोप