Top News

‘तेजस्वी यादव चांगले व्यक्ती, ते बिहारचं नेतृत्व करू शकतात’; ‘या’ भाजप नेत्याकडून तेजस्वी यादव यांचं कौतुक

भोपाळ | बिहारमध्ये महाआघाडीचं नेतृत्व करणाऱ्या तेजस्वी यांदव यांची भाजप नेत्या उमा भारती यांनी स्तृती केली आहे. तेजस्वी यादव एक चांगले व्यक्ती आहेत. तसंच ते बिहारला चालवू शकतात, असं उमा भारती यांनी म्हटलं आहे.

उमा भारती यांनी भोपाळमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उमा भारती यांनी बिहार विधानसभा निवडणुका आणि मध्यप्रदेशात पार पडलेल्या पोटनिवडणुकांवर भाष्य केलं.

तेजस्वी यादव हे एक चांगले व्यक्ती आहेत. परंतु सध्या ते राज्य चालवण्यास सक्षम नाहीत. राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा बिहारला जंगलराजमध्ये ढकललं असतं. तेजस्वी यादव हे नेतृत्व करू शकतात. पण थोडं मोठं झाल्यानंतर, असं उमा भारती यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उमा भारती यांनी कमलनाथ यांचंही कौतुक केलंय. कमलनाथ यांनी ही निवडणूक चांगल्याप्रकारे लढली. परंतु त्यांनी जर आपलं सरकार योग्यरितीनं चालवलं असतं तर आज या ठिकाणी इतक्या समस्या निर्माण झाल्या नसत्या. ते एक चांगले व्यक्ती आहेत आणि माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत, असं उमा भारती म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

क्रिकेटमधील निवृत्तीनंतर धोनी वळला ‘या’ व्यवसायाकडे!

‘या’मुळे औरंगाबाद आणि नागपूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीत बंडखोरीची शक्यता

महाराष्ट्र सरकारने सामान्यांना केंद्रस्थानी ठेवून घेतले कोरोनाबाबत निर्णय, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त; ट्विटरवरून स्वतः दिली माहिती

खेळ तर आता सुरू झालाय…; तुरुंगातून सुटल्यानंतर अर्णब गोस्वामींचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या