बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून रेणू शर्माने बलात्काराची तक्रार मागे घेतली’; ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई | रेणू शर्मा यांनी कौटुंबिक कारणास्तव आपण ही तक्रार मागे घेतोय, असं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. यानंतर भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय.

धनंजय मुंडे यांनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्यानेच त्यांनी तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट उमा खापरे यांनी केला आहे.

अगोदरपासून तिच्यावर तक्रार मागे घेण्यासंबंधी दबाव होता. आता तिने ही तक्रार मागे घेतली आहे. आम्हाला याचं आश्चर्य वाटत नाही. आमचा मुद्दा हा आहे की धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात दुसऱ्या बायकोचा उल्लेख तसंच तिच्यापासून झालेल्या दोन मुलांचा उल्लेख केला नाही ते कायद्याच्या परिघाबाहेर आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, असं उमा खापरे यांनी म्हटलंय.

दरम्यान, रेणू शर्मांनी तक्रार मागे घेतल्याने विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

थोडक्यात बातम्या-

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीवर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

सरकार पाडण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न सुरू आहेत, पण…- शरद पवार

मला मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं तर काय करु?; शरद पवारांचा मिश्कील सवाल

“धनंजय मुंडेंवर खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर कारवाई व्हावी”

धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता- शरद पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More