बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली ट्रोल

मुंबई | दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया आपल्या अदाकारीने अनेकांच्या गळ्यातलं ताईत बनली आहे. तमन्नाने ‘चाँद सा रोशन चेहरा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. तमन्ना दक्षिणेतील आघाडीची कलाकार असून बाहुबली चित्रपटापासून तिचा चाहतावर्ग चांगलाच वाढला आहे. बॉलिवूडमध्येही तिने आपलं स्वत:चं वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. मात्र तमन्ना सध्या सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे.

तमन्ना तिच्या एका लुकमुळे ट्रोल झाली आहे. विमानतळावर तमन्ना दिसली त्यावेळी तिच्यासोबत तिची आईही होती. यावेळी तिने क्रॉप टॉप, ट्राऊझर पँट अशा साधारण लूकमध्ये होती. मात्र तरीही तिला का ट्रोल जात आहे तर तिचा टॉप पाहून नेटकऱ्यांनी नको त्या कमेंट्स केल्या आहेत.

तमन्न आपलं शर्ट खाली करायला विसरली असावी असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने,’छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, अशा खिल्ली उडवणाऱ्या कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आहे. जितके श्रीमंत आहेत तितकेच गरीब तर तुम्हाला पाहून अभिनेत्री दिशा पटानीची आठवण आल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, तमन्ना भाटिया मात्र कोणताही चित्रपट हाती घेत असताना ती एक अट घालत असते. चित्रपटामध्ये चुंबन दृश्य देणार नाही ही अट ती घालत असते. मात्र अभिनेता ह्रतिक रोशनसाठी ही अट तोडण्यास ती तयार असल्याचं म्हटलं होतं. तमन्ना ह्रतिक रोशनची फार मोठी चाहती आहे. त्यामुळे त्याच्यासोबत चित्रपट करण्याचा योग आला तर ती चुंबन दृश्य देण्यासही ती तयार आहे.

थोडक्यात बातम्या-

पुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस

‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा

मराठा आरक्षणासाठी वंचितचा एल्गार! मराठा मोर्चात स्वत: प्रकाश आंबेडकर उतरणार

नागीन फेम पर्ल पूरीला बलात्कार प्रकरणी अखेर जामीन

“सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More