बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात गारपिटीमुळे गारांचा खच, विश्वास बसणार नाही असा व्हिडीओ-

सातारा | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन परिसरातील रस्त्यावर गारांचा खच पडलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावत बुधवारी संध्याकाळी या परिसरात गारपीट झाली.

वाठार स्टेशन येथे झालेल्या गारपिटीचा येथील स्थानिक नागरिकांनी व्हिडिओ काढला. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये गारांचा रस्त्यावर अक्षरशः खच पडलेला दिसून येत आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही आज संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

बुधवारी संध्याकाळी वाठार स्टेशन परिसरात झालेल्या गारपिटीमुळे रस्त्यावर गारांचा खच पडलेला दिसून आला तसेच यामुळे पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर हा नक्की महाराष्ट्रच आहे का? असा प्रश्न पडतो.

पाहा व्हिडीओ – 

थोडक्यात बातम्या

संचारबंदीमुळे परप्रांतीय मजूर परतीच्या वाटेवर; बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी

जाणुन घ्या पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी

संचारबंदीकाळात महाराष्ट्रात दारू मिळणार की नाही?

महत्वाची बातमी! संचारबंदीकाळात वाहतुकीसाठीचे निर्बंध काय? वाचा एका क्लिकवर…

निर्बंध असतानाही कटिंगचं दुकान सुरू; पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून व्यावसायिकाचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More