नवी दिल्ली | भारतातील (India) मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी, मुलींचा दर्जा उंचवण्यासाठी केंद्र सरकार नेहमी सकारात्मक पाऊल उचलत असतं. मुलींसाठी अनेक अशा योजना सरकार राबवत आहे. सुकन्या समृद्धी योजना, बालिका समृद्ध योजना आणि माझी कन्या भाग्यश्री योजना याचं उदाहरण देता येईल.
यातीलच एक म्हणजे लाडली लक्ष्मी योजना (Ladli Lakshmi Yojana) होय. लाडली लक्ष्मी योजना 2007 मध्ये मध्य प्रदेशमध्ये सुरु करण्यात आली. त्यानंतर इतर राज्यातदेखील कालांतराने राबवण्यात आली. ही योजना मुलीना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पुढाकार घेतं. या योजनेअंतर्गत तुमच्या मुलीच्या शाळेत जाण्याच्या खर्च सरकारकडून केला जातो.
या योजनेअंतर्गत मुलीच्या लग्नासाठी अर्जदाराच्या कुटुंबाला 1 लाख रु सरकार प्रदान करते. या योजनेचा फायदा सर्व पालक घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत मुलीच्या नावावार तिच्या जन्मानंतर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate) खरेदी केलं जात. ज्यामुळे मुलीच्या नावावर 5 वर्षासाठी 6,000 रुपये जमा केले जातात.
तुमची मुलगी 5 वर्षाची होईपर्यंत तुमच्याकडं तिच्यासाठी 30,000 जमा झालेले असतील. तुमची मुलगी 6 वर्षाची झाल्यास तिला शाळेत प्रवेश करण्यासाठी 2,000 ची आर्थिक मदत केली जाते. यानंतर 9वी इयत्तेत प्रवेश केल्यानंतर 4,000 तर 11 वी आणि 12वी मध्ये प्रवेश केल्यानंतर 6,000 रुपये तिच्या शिक्षणासाठी (Education) तिला दिले जातात.
यासोबत जेव्हा तुमची मुलगी 21 वर्षाची होईल तेव्हा तिला 1 लाखाची आर्थिक मदत केली जाते. तीच्या उज्ज्वल भविष्यासाठी(Future), शिक्षणासाठी ती वापरु शकते. हे मिळालेले एक लाख रुपये तुम्ही मुलीच्या लग्नासाठी देखील वापरु शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीच्या जन्मापासून ते लग्नापर्यंतचा खर्च मिळवू शकता.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आमचंही ठरलंय धडा कसा शिकवायचा’; ब्राम्हण समाज संतप्त
- …म्हणून लग्नानंतर पुरुष दुसऱ्या स्त्रियांकडं आकर्षित होतात!
- कलाटे ऐकायलाच तयार नाहीत; आता थेट उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान
- ‘या’ योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार महिन्याला 3000 रुपये
- वजन कमी करण्यासाठी कांद्याचा असाही उपयोग!