बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भाषेऐवजी भावना आणि शब्दांऐवजी संवेदना समजून घ्या’; रोहित पवारांची MPSCला विनंती

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 2 तारखेला होणाऱ्या परीक्षा रद्द झाल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलेल्या या भूमिकेवर संताप व्यक्त केला. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एमपीएससीकडे मागणी केल्याचं पहायला मिळालं.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कामकाजाबद्दल असभ्य, असंस्कृत आणि असंसदीय भाषा वापरणाऱ्यात आली. या उमेदवारांविरोधात आयोगाने कारवाईचा बडगा उचलला आहे. एमपीएससीच्या कार्य पद्धतीबद्दल चुकीची भाषा वापरणाऱ्या उमेदवारांना काही कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारण्यात येईल, असा इशारा एसपीएससीकडून देण्यात आला. याबाबत आता रोहित पवार यांनी ट्विट करत मागणी केली आहे.

मुलांनी भाषा योग्य वापरावी, यात शंकाच नाही, पण एमपीएससीनंही अचानक परीक्षा रद्द करणं, निकाल वेळेत न लावणं, मुलांच्या शंकांचं वेळीच निरसन न करणं, हे टाळावं, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

भाषेऐवजी भावना आणि शब्दांऐवजी संवेदना समजून घेऊन हे पत्र मागं घ्यावं, ही विद्यार्थ्यांच्यावतीने विनंती!, असंही पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता एमपीएससी परीक्षेबाबत काय निर्णय घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या –

मोठा झटका! Quinton de Kockची अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

MARD Doctor Strike: कोरोनाचं सावट घोंगावत असताना डाॅक्टरांचा आजपासून संप

गोव्यात राडा: ‘या’ स्टार खेळाडूच्या पुतळ्यावरुन नवा वाद

Corona: राज्यात नवीन नियमावली जाहीर, ‘हे’ असणार नवे नियम

“माझा जास्त वेळ जुन्या गोष्टी शोधून त्या दुरुस्त करण्यातच जात आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More