बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या”

पुणे | तीन भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. मात्र, खेड पंचायत समितीमध्ये काहीसं वेगळं चित्र पहायला मिळत आहे. शिवसेनेला बहुमत असताना देखील पंचायत समितीवर शिवसेनेला सभापती पदाची खुर्ची हातातून निसटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या हस्तक्षेप केल्यामुळे शिवसेनेने संधी गमावल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या, असं म्हणत मोहिते पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला आहे. हा सर्व वाद स्थानिक पातळीवरचा आहे. त्याचा महाविकास आघाडी सरकारवर काहीच परिणाम होणार नाही, असं देखील त्यांनी पुढं बोलताना नमूद केलं आहे. या वादामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडते की काय? अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

खेड तालुक्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याचं कारण हे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यायला हवं. शिवसेनेचे भगवान पोखरकर यांना सभापती केल्यानंतर राष्ट्रवादीचा सहा महिन्यांनी सभापती करण्यात येणार होता, असं ठरलं देखील होतं. मात्र, उर्वरीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांना सहा महिन्यांनी संधी मिळत नव्हती. त्यामुळे पोखरकर यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्यात आला. पण, या घटनेनंतर त्याला वेगळं वळण देण्याचं काम आढळराव पाटलांनी केलं आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील हे माजी खासदार आहेत. त्यांचा शिवसेनेला जास्त फायदा होणार नाही. एका माजी खासदारामुळे दोन्ही पक्षात वाद होतील असं वाटत नाही. काही लोकांना वादाशिवाय करमत नाही, असा टोला देखील मोहिते पाटलांनी आढळराव पाटलांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या –

संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ! ‘इतक्या’ शस्त्रधारी जवानांचं राऊतांना संरक्षण

शिल्पा शेट्टीचा मोठा निर्णय; जवळच्या मैत्रिणीने केला ‘हा’ खुलासा

जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टेस्ला लवकरच भारतीय बाजारात; ‘या’ चार इलेक्ट्रिक गाड्यांना मंजुरी

वादात सापडलेल्या ‘त्या’ जाहिरातीवर झोमॅटोने दिलं स्पष्टीकरण

‘मुलींनी कंडोम विकत घेण्यात गैर काय?’;’या’ अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More