Top News

2017-18 मध्ये बेरोजगारीच्या दरानं 45 वर्षांचा विक्रम मोडला- बिझनेस स्टँडर्ड

मुंबई | भारतातील बेरोजगारीच्या दरानं गेल्या 45 वर्षांचं रेकार्ड मोडलं असून 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर 6.1 टक्के  होता, असं NSSO च्या पीएलएफएस रिपोर्टमधून स्पष्ट झाल्याचं समोर येत आहे. बिझनेस स्टँडर्ड या वृत्तपत्रानं याबाबत वृत्त दिलं आहे.

NSSO च्या सर्व्हेत 2017-18 मध्ये शहरी भागात बेरोजगारीचा दर 7.8 टक्के होता तर ग्रामीण भागात 5.3 टक्के राहिला, असं बिझनेस स्टँडर्डच्या बातमीत म्हटलं आहे.

NSSO चे चेअरमन पीसी मोहनन यांच्या सह दोन सदस्यांनी रिपोर्ट जाहीर करण्यासाठी उशीर होत असल्यामुळं राजीनामा दिला आहे.

दरम्यान, 1972-73 नंतरचा 6.1 हा बेरोजगारीचा सर्वोच्च दर ठरला असून हा रिपोर्ट नरेंद्र मोदी यांच्यासाठी लोकसभा निवडणूक समोर असताना अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या-

अजित पवारांचं भाषण सुरु असताना जिल्हाध्यक्षांचं मोबाईलमध्ये तोंड, पुढं काय झालं?

-सोनिया गांधींचे निकटवर्तीय आणि राज ठाकरे यांच्यात 20 मिनिटे चर्चा!

पोटनिवडणूक : जिंदमध्ये भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने; काँग्रेस तिसऱ्या स्थानावर

राजस्थानच्या रामगडमध्ये काँग्रेसचा विजय; भाजपला चारली पराभवाची धूळ

मुख्यमंत्रिपदावर असेपर्यंत भ्रष्टाचार करत रहायचा का?,अण्णांचा सरकारला सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या