बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दुर्दैवी! पैशांसाठी कुटुंबाला कोरोनाचं औषध म्हणून दिलं विष; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

नवी दिल्ली | देशात सध्या कोरोनामुळे हाहाकार माजला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र दिसून येत आहे. तसेच देशभरात सध्या लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.

एकीकडे लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असतानाच तामिळनाडूमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तामिळनाडूमधील एका कुटुंबातील तिघा जणांचा कोरोनाचं औषध म्हणून विष दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एका जणाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, तामिळनाडूमधील ईरोडमध्ये ही घटना घडली असून एका 72 वर्षीय व्यक्तीने काही महिन्यांपूर्वी कल्याणसुंदरम नावाच्या व्यक्तीला 15 लाख रुपये दिले होते. कल्याणसुंदरम यांच्याकडे तो व्यक्ती पैशाची मागणी करत होता, पण कल्याणसुंदरम हा पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. अखेर कल्याणसुंदरम याने पैसे बुडवण्यासाठी एक कट रचला.

कल्याणसुंदरम याने सबरी नावाच्या व्यक्तीसोबत संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा कट रचला आणि सबरी हा तोतया आरोग्य विभागाचा कर्मचारी बनुन करुप्पणकाउंडर या कर्ज दिलेल्या व्यक्तीच्या घरी पोहोचला. तसेच आपण कोरोनाचं औषध देण्यासाठी आलो असल्याचं त्याने कुटुंबीयांना सांगितलं व बरोबर आणलेल्या गोळ्या कुटुंबातील व्यक्तिंना दिल्या. या गोळ्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी असल्याचं सांगत तो तिथून निघून गेला.

कुटुंबातील तीन व्यक्ती व घरकाम करणाऱ्या एका व्यक्तीने या गोळ्या प्राशन केल्या. एकूण चार जणांनी विषबाधित गोळ्या प्राशन केल्याने मुलगी दीपा, पत्नी मल्लिका व घरकाम करणाऱ्या महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर करुप्पणकाऊंडर हे सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. या प्रकरणातील आरोपींना तामिळनाडू पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

‘ओबीसी असल्याने मला  महसूल खातं मिळालं नाही’; वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर थोरात म्हणाले….

“संजय राऊतसारख्या भाटाची धनगर समाजाला आवश्यकता नाही”

‘… तो वाघच नसतो त्याला पालतू कुत्रा म्हणतात’; नितेश राणे

डेल्टा प्लस व्हेरिएंटची चिंता करू नका; CSIR शास्त्रज्ञांनी केला मोठा खुलासा, म्हणतात…

‘तुझ्यात जीव रंगला’ मधील वहिणीसाहेबांच्या बाळाचा चेहरा अन् नाव आलं समोर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More