कर्मचाऱ्यांनो महाराष्ट्रात नवीन पेन्शन योजनेचा लाभ कधी मिळणार? जाणून घ्या

UPS Pension l सरकारी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन योजना (UPS) लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी 1 जानेवारी 2004 नंतर सेवेत रुजू झालेल्या 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS) अंतर्गत पगाराच्या 50 टक्के निश्चित पेन्शन म्हणून देण्यास मंजुरी दिली आहे. पण कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रात नवीन पेन्शन योजनेचा लाभ कधी मिळणार हे माहित आहे का? तर जाणून घेऊयात…

युनिफाइड पेन्शन योजना कधीपासून लागू होणार? :

युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) अंतर्गत, सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या आधीच्या 12 महिन्यांत काढलेल्या सरासरी मूळ वेतनाच्या 50 टक्के पेन्शन म्हणून मिळण्याचा अधिकार असणार आहे. त्यामुळे पगाराच्या 50 टक्के पेन्शन म्हणून मिळण्यासाठी किमान 25 वर्षे सेवा कालावधी असणं गरजेचं आहे. तसेच

संपूर्ण भारतातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू केली जाणार आहे. तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या युनिफाइड पेन्शन योजनेचा सुमारे 23 लाख केंद्र सरकार आणि 90 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

UPS Pension l महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना कधी लाभ मिळणार? :

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार यूपीएस योजना यंदाच्या वर्षी मार्चपासून लागू होणार असून राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ या वर्षी नोव्हेंबरमध्ये संपत असून विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत अखंडित वीजपुरवठा योजनेचा विस्तार करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

मंत्रिमंडळाने 7,000 कोटी रुपयांच्या नार-पार-गिरणा नदी आंतरलिंकिंग योजनेला देखील मंजुरी दिली आहे, ज्याचा फायदा प्रामुख्याने नाशिक आणि जळगावसारख्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना होणार आहे. तसेच राज्य सरकार ठाणे जिल्ह्यात एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याची योजना आखत आहे यासाठी 5000 कोटी रु.खर्च येणार असल्याची माहिती मिळत आहे.

News Title – Unified Pension Scheme

महत्त्वाच्या बातम्या-

राजकीय उलथापालथ! महायुतीचे 9 बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

सप्टेंबर महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या यादी

गुडन्यूज! ‘या’ तारखेला लॉन्च होणार आयफोन 16?, जाणून घ्या फीचर्स

‘ती आधीच सेमिनार हॉलमध्ये…’; कोलकाता रेप प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा

जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर आनंदाची बातमी! सोनं झालं स्वस्त