Job Recruitment l युनियन बँक ऑफ इंडियाने अप्रेंटिसच्या २६९१ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत १२ मार्च २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
पदांची माहिती:
पदाचे नाव: अप्रेंटिस
एकूण पदे: २६९१
शैक्षणिक पात्रता:
उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवीधर असावा.
उमेदवारांनी ०१.०४.२०२१ रोजी किंवा त्यानंतर पदवी पूर्ण केलेली असावी.
उमेदवारांकडे पदवी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र असावे.
वयोमर्यादा १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत २० ते २८ वर्षे आहे.
Job Recruitment l निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्थानिक भाषा ज्ञान चाचणी, वेट लिस्ट, वैद्यकीय तपासणी इत्यादी टप्प्यांमधून केली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत:
उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ मार्च २०२५
इतर महत्त्वाची माहिती:
स्टायपेंड: १५,००० रुपये
प्रशिक्षण कालावधी: १ वर्ष
अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in ला भेट द्या.
– मुखपृष्ठावरील “करिअर” विभागात जा.
– अप्रेंटिस भरती लिंकवर क्लिक करा.
– “ऑनलाइन अर्ज करा” निवडा आणि आवश्यक नोंदणी तपशील भरा.
– अर्ज फॉर्म भरण्यासाठी लॉग इन करा.
– आवश्यक अर्ज शुल्क भरा.
– फॉर्म सबमिट करा आणि पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा.
– भविष्यातील संदर्भासाठी अर्ज फॉर्मची प्रिंटआउट घ्या.