Union Bank of India Recruitment | सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये (Union Bank of India Recruitment) मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बँकेत २६९१ अप्रेंटिसशिप (Apprenticeship) पदांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झाली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि पदवीधर तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
अर्ज कसा आणि कुठे करायचा?
इच्छुक उमेदवार युनियन बँकेच्या www.unionbankofindia.co किंवा bfsissc.com या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०२५ आहे. देशभरात २६९१ पदांवर भरती केली जाईल. विविध राज्ये आणि प्रदेशांसाठी असलेल्या जागांची यादी खाली दिली आहे.
रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे:
आंध्र प्रदेश: ५४९
अरुणाचल प्रदेश: १
आसाम: १२
बिहार: २०
चंदीगड: १३
छत्तीसगड: १३
गोवा: १९
गुजरात: १२५
हरियाणा: ३३
हिमाचल प्रदेश: २
जम्मू-काश्मीर: ४
झारखंड: १७
कर्नाटक: २७
महाराष्ट्र (Maharashtra): २९६
दिल्ली (Delhi): ६९
ओडिशा: ५३
पंजाब: ४८
राजस्थान: ४१
तामिळनाडू: १२२
तेलंगणा: ३०४
उत्तराखंड: ९
उत्तर प्रदेश: ३६१
पश्चिम बंगाल: ७८
आवश्यक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराने १ एप्रिल २०२१ रोजी किंवा त्यानंतर पदवी प्राप्त केलेली असावी. (Union Bank of India Recruitment)
वयोमर्यादा
१ फेब्रुवारी २०२५ रोजी उमेदवाराचे वय कमीतकमी २० वर्षे आणि जास्तीत जास्त २८ वर्षे असावे. परंतु, विविध श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाते. OBC उमेदवारांना ३ वर्षांची, SC/ST उमेदवारांना ५ वर्षांची आणि PWBD (दिव्यांग व्यक्ती) उमेदवारांना १० वर्षांची सूट मिळेल.
Title : Union Bank of India Recruitment 2025 Apply for 2691 Apprentice Posts