आयकर प्रणालीत महत्वाचे बदल; तुम्हाला किती कर भरावा लागणार?

Union Budget 2024 25 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये आयकराबाबत मोठी घोषणा केली आहे. अशातच आता नवीन करप्रणालीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. तीन लाखांच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. या आयकर स्लॅबबाबत मोठे बदल जाहीर केले आहेत. आता नवीन करप्राणालीत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजार रूपयांवरून 75 हजार रूपये करण्यात आली आहे. (Union Budget 2024 25)

मात्र या जुन्या प्राप्तिकर प्रणालीत रिर्टन भरण्याबाबत निराशादायक घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. त्यांच्यासाठी करात सवलत आलेली नाही. अर्थमंत्र्यांनी जून्या करातील मूळ सूट मर्यादेत वाढ केली नाही. कर दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढीचा लाभही मिळणार नाही. (Union Budget 2024 25)

मोदी सरकारचा हा सलग 11 वा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. तसेच निर्मला सितारामन यांनी हा 7 व्यांदा बजेट सादर केला आहे. यावेळच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पगारदार व्यक्तींसाठी मोठ्या तरतुदीची अपेक्षा होती. आयकर आकारणीच्या तरतुदीमध्ये सरकारला संधी होती. (Union Budget 2024-25)

जून्या कर प्रणालीत असा कर लागणार

तीन लाखांपर्यंत कसलाही कर नाही

तीन ते साडेसात लाखांपर्यंत 5 टक्के कर

सात ते दहा लाख 10 टक्के कर

दहा ते बारा लाखाला 15 टक्के कर

12 ते 15 लाखांसाठी 20 टक्के कर

तसेच 15 लाखांहून अधिक उत्पन्नासाठी 30 टक्के कर आकारावा लागणार आहे.

2018 मध्ये अर्थसंकल्पात स्‍टँडर्ड डिडक्‍शनमध्ये बदल केला होता. त्यावेळी 40,000 रूपये स्टँडर्ड डिडक्शन केलं होतं. त्यानंतर 2019 मधील अर्थसंकल्पात ती मर्यादा ही 50,000 रूपयांपर्यंत होती. त्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. (Union Budget 2024 25)

News Title – Union Budget 2024 25 Income Tax Announcement

महत्त्वाच्या बातम्या

मोदी सरकारच्या बजेटमधील 10 महत्वाच्या घोषणा!

घराचं स्वप्न होणार साकार! मोदी सरकारची अफोर्डेबल हाउसिंग स्कीमवर मोठी घोषणा

कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा! अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची बजेटमध्ये मोठी घोषणा

मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?; वाचा सविस्तर

मोदी सरकारचं चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांना मोठं गिफ्ट; दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा