Union Budget 2024-25 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात निर्मला सितारामन यांनी देशातील गोरगरीब, शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. मोदी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामुळे या अर्थसंकल्पाकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. सरकारने यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात 1.52 लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं निर्मला सितारामन यांनी सांगितलं. (Union Budget 2024-25)
केंद्र सरकारने 20 लाख तरूणांना रोजगार देणार असल्याचं सांगितलं. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी 10 लाख रूपयांच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली आहे. कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवायचा असल्याचं अर्थसंकल्पात सांगितलं गेलं आहे. (Union Budget 2024-25)
अशातच आता यंदाच्या अर्थसंकल्पात वसतिगृह बांधण्यासाठी आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भागीदारी करून हे सुलभ केले जाईल असंही अर्थमंत्री म्हणाल्या. तसेच या सुरू असलेल्या अर्थसंकल्पात काय महाग? आणि काय स्वस्त? याबाबतची माहिती दिली आहे. (Union Budget 2024-25)
काय स्वस्त ?
सोनं-चांदी स्वस्त होणार
मोबाईल हँडसेट मोबाईल चार्जरच्या किंमती 15 टक्क्यांनी कमी
मोबाईलचे काही पार्ट
कॅन्सरवरील औषधे
पोलाद, तांबे उत्पादनावरील करसवलत
लिथियम बॅटरी स्वस्त
सोलार सेट
इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार
चमड्यांपासून बनवणाऱ्या वस्तू
पीवीसी फ्लेक्स बॅनर
विजेची तार
महाग काय?
प्लास्टीक उद्योगांवर करांचा बोझा वाढणार
प्लास्टीक उत्पादने महाग होणार
News Title – Union Budget 2024-25 Modi Government
महत्त्वाच्या बातम्या
तरुणांसाठी खुशखबर! पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना मिळणार 15000 रुपयांचा भत्ता, पैसे येणार थेट खात्यात
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा, सरकारकडून मोठ्या घोषणा!
केंद्रीय अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग?, सगळ्या घोषणा वाचा एका क्लिकवर
आनंदवार्ता! बजेटपुर्वीच सोनं झालं स्वस्त?, जाणून घ्या आजच्या नव्या किमती
आज ‘या’ राशीच्या व्यक्तींना मोठा आर्थिक लाभ होणार!