Union Budget 2024-25 | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज 23 जुलैरोजी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर मोदी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार समाजघटकांवर आपण लक्ष केंद्रीत करायला हवं. अंतरिम अर्थसंकल्पात आपण तेच केले असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले.
या अर्थसंकल्पात 9 घटकांवर लक्ष (Union Budget 2024-25 ) केंद्रीत करण्यात आले आहे. यामध्ये शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पीढीतील सुधारणा आदींचा समावेश आहे.
अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा?
पीएम आवास योजनेंतर्गत 3 कोटी नवी घरं : पीएम आवास योजनेंतर्गत 3 कोटी नवी घरं बांधणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची संसदेत माहिती. पोलावरम प्रोजेक्टसाठी आर्थिक मदतीचीही घोषणा. ग्रामीण विकास इन्फ्रासाठी 2.66 लाख कोटी रुपयांची तरतूद. महिलांशी निगडीत योजांसाठीही 3 लाख कोटी रुपयांची तरतूद.
21400 कोटी रुपयांचे पॉवर प्रोजेक्ट विकसित केले जातील. आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा. बिहारमध्ये नवे मेडिकल कॉलेज आणि एअरपोर्ट्स तयार केले जाणार.
वर्षाला 25000 विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात 7.5 लाखांचं कर्ज: पंतप्रधान योजनेंतर्गत 3 टप्प्यांमध्ये 15 हजार रुपये दिले जातील. देशातच उच्च शिक्षणासाठी 10 लाखांच्या लोन स्कीमची घोषणा. वर्षाला 25000 विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात 7.5 लाखांचं कर्ज मिळणार. तर पूर्वेकडील राज्यांसाठी पूर्वोदय योजनेची घोषणा. यामध्ये बिहार, झारखंड, ओडिशाचाही समावेश. पूर्वेकडील राज्यांच्या एक्स्प्रेस हायवेसाठी 26000 कोटींची तरतूद
20 लाख तरुणांना रोजगारासाठी प्रशिक्षण : रोजगार दिल्यास इन्सेटिव्ह मिळणार. सरकार इन्सेटिव्ह देण्यासाठी 3 स्कीम्स आणणार आहे. पंतप्रधान योजनेंतर्गत3 टप्प्यांमध्ये इन्सेन्टिव्ह दिले जाणार. महिलांसाठी वर्किंग हॉस्टेल तयार करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी दिली. याशिवाय 20 लाख तरुणांना रोजगारासाठी प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.
100 शहरांमध्ये इंडस्ट्रीयल पार्क विकसित केले जातील : 100 शहरांमध्ये इंडस्ट्रीयल पार्क विकसित केले जाणार. इंडस्ट्रिय वर्कर्ससाठी डॉर्मिट्री तयार करणार. 5 वर्षांमध्ये टॉप 500 (Union Budget 2024-25 )कंपन्यांना 1 कोटी तरुणांना संधी दिली जाणार.
पदेशात संपत्तींची खरेदी केली जाणार: सरकारची ऑफशोअर मायनिंग ब्लॉकचा लिलाव करण्याची योजना असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी क्रिटकल मिनरल योजनेची घोषणा करण्यात आली. याअंतर्गत पदेशात संपत्तींची खरेदी केली जाणार.
इंटर्नशिपसाठी व्यापक योजना : तरुणांना इंटर्नशिपसाठी व्यापक योजना आणण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. सरकारी बँका अंतर्गत पडताळणीनंतर एमएसएमईला कर्ज देणार. खासगी क्षेत्रासोबच मिळून ई कॉमर्स एक्सपोर्ट हब बनेल असं अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या.
कृषीक्षेत्रासाठीच्या घोषणा :
- नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले जाणार कृषी उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर असणार आहे.
- डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण(Union Budget 2024-25 ) होण्यावर भर
- शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार, सहा कोटी शेतकऱ्यांचा रेकॉर्ड डिजिटल होणार
- शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाईल. त्यातून शेतीपिकांंचं सर्वेक्षण, मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल.
- या वर्षी शेती व संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे
- सोयाबीन आणि सुर्यफुल (Union Budget 2024 ) बियांची साठवण वाढवली जाणार आहे.
- 32 फळ आणि भाज्यांच्या 109 जाती वितरीत करणार आहे.
रोजगार आणि कौशल्य विकास : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील रोजगार वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. संघटित क्षेत्रात प्रथमच कामाला लागणाऱ्या तरुणांना प्रोत्साहनपर भत्ता मिळणार आहे. याचे बँक खात्यात तीन टप्प्यांत थेट पैसे जमा केले जातील. या योजनेनुसार नवीन नोकरदारांना 15 हजारापर्यंतचा प्रोत्साहनपर भत्ता म्हणजेच Incentive मिळेल. मात्र, यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. महिन्याला 1 लाख पेक्षा कमी वेतन असणारे नोकरदार या (Union Budget 2024) योजनेसाठी पात्र असतील. हे पैसे EPFO खात्यात जमा होतील.
बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी विशेष तरतूद : अर्थसंकल्पात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. दोन्ही नेत्यांच्या राज्यांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. आंध्रप्रदेशला अतिरिक्त 15 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंध्र प्रदेशमधील पोलावरम सिंचन योजना पूर्ण करण्याची ग्वाहीही अर्थसंकल्पातून चंद्राबाबूंना देण्यात आली आहे. तर (Union Budget 2024-25 )बिहारमध्ये एक्सप्रेस वे बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे.बिहारमध्ये रस्ते बांधणीवर भर दिला जाणार असून पटना-पूर्णिया एक्सप्रेसवे, बक्सर-भागलपूर राजमार्ग, बुद्धगया-राजगीर-वैशाली-दरभंगा आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर पूल बांधण्यासाठी 26 हजार कोटी रुपये दिले जाण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
काय स्वस्त होणार आणि काय महागणार? : सोनं-चांदी स्वस्त होणार, मोबाईल हँडसेट मोबाईल चार्जरच्या किंमती 15 टक्क्यांनी कमी, मोबाईलचे काही पार्ट, कॅन्सरवरील औषधे, पोलाद, तांबे उत्पादनावरील करसवलत, लिथियम बॅटरी स्वस्त, सोलार सेट, इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार, चमड्यांपासून बनवणाऱ्या वस्तू, पीवीसी फ्लेक्स बॅनर, विजेची तार स्वस्त होणार आहे. तर , प्लास्टीक उद्योगांवर करांचा बोझा वाढणार आहे. प्लास्टीक उत्पादने महाग होणार आहेत.
News Title- Union Budget 2024-25
महत्वाच्या बातम्या-
आनंदवार्ता! बजेटपुर्वीच सोनं झालं स्वस्त?, जाणून घ्या आजच्या नव्या किमती
आज ‘या’ राशीच्या व्यक्तींना मोठा आर्थिक लाभ होणार!
शरद पवारांनी घेतली CM शिंदेंची भेट; नेमकी काय चर्चा झाली?
“मनोज जरांगेंसाठी लाडका आंदोलक योजना काढा”, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
“शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असतील तर, मग अजित पवार कोण?”