Union Budget 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देशाचं आर्थिक बजेट सादर केलं. या बजेटमध्ये सरकारच्या अफोर्डेबल हाउसिंग स्कीमवर 10 लाख कोटींच्या बजेटमध्ये लोकांच्या घराच्या गरजा पूर्ण केल्या जातील, असं अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून निर्मला सितारामन यांनी तीन कोटी अतिरिक्त घरे बांधण्यात येणार असल्याचं सांगितलं. सिमेंट क्षेत्रासाठी ही एक सकारात्मक बाब आहे. (Union Budget 2024)
14 मोठ्या शहरांचा विकास
अर्थमंत्र्यांनी 80,671 कोटींची पीएम आवास योजनेवर तरतूद केली होती. मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेवर सरकारचा भर राहणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. 30 लाखांपेक्षा जास्त असलेल्या 14 मोठ्या शहरांचा विकास करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. पीएम आवास योजनेच्या अंतर्गत 10 लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह शहरी घरांची योजना केली आहे. (Union Budget 2024)
शहरी घरांसाठी 2 लाख कोटी रूपये देण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. पीएमवाय अर्बन हाऊसिंग 2.0 अंतर्गत 10 लाख कोटी रुपयांच्या बजेटमधून लोकांच्या घरांच्या गरजा पूर्ण केल्या जातील, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. (Union Budget 2024)
केंद्र सरकार 2 लाख कोटी रूपयांची मदत करणार
केंद्र सरकार 2 लाख कोटी रूपयांची मदत करेल आणि या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी सवलतींच्या घरांसाठी ऑफर दिली आहे. अर्थमंत्र्यांनी उद्योगात काम करणाऱ्या कामगारांसाठी भाडेतत्वावरील घरांची योजना ही जाहीर करण्यात आली आहे. (Union Budget 2024)
यासाठी आवश्यक असणाऱ्या मुद्रा कर्जाची मर्यादा ही 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. सरकारने पर्यटनावर विशेष भर दिला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे.
News Title – Union Budget 2024 Marathi News Update
महत्त्वाच्या बातम्या
मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?; वाचा सविस्तर
मोदी सरकारचं चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांना मोठं गिफ्ट; दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा
तरुणांसाठी खुशखबर! पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना मिळणार 15000 रुपयांचा भत्ता, पैसे येणार थेट खात्यात
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा, सरकारकडून मोठ्या घोषणा!
केंद्रीय अर्थसंकल्पात कुणाला काय मिळालं?, वाचा A to Z सगळी माहिती एका क्लिकवर