गुडन्यूज! बजेटनंतर सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी स्वस्त, खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी

Union Budget 2024 | एप्रिल आणि मे या महिन्यात सोन्याच्या किमतीमध्ये विक्रमी नोंद झाली. या दोन महिन्यात सोनं प्रथमच 70 हजारांच्याही पुढे गेलं होतं. त्यामुळे या पाच-सहा महिन्यात सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी खूपच कमी दिसून आली. मात्र, आज 23 जुलैरोजी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला (Union Budget 2024) आहे.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन (Nirmala Sitaraman) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात आज मोठ्या घोषणा करण्यात आल्या. तसेच सोने-चांदीच्या दरातही मोठी कपात या बजेटमधील निर्णयामुळे झाली आहे.

सोनं 3 हजारांनी स्वस्त

बजेट सादर होताच सोन्याच्या किमती 3 हजारांनी कमी झाल्या आहेत. केंद्राने सादर केलेल्या अर्थ संकल्पात सोन्याच्या कस्टम ड्युटीमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सोन्याच्या दरात अवघ्या दोन तासात 3 हजार रुपयांची घट झाल्याचे दिसून आले.

यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने सोने-चांदीच्या सीमा शुल्कात कपात केली आहे. यापुर्वी सोने-चांदीचे सीमा शुल्क 15 टक्के होते. आता यात कपात करून सीमा (Union Budget 2024)शुल्क थेट 6 टक्क्यांवर आणण्यात आले आहे.

काय बदल झाले?

सोने, चांदीवरील सीमा शुल्क – 6 टक्के करण्यात आले.
प्लॅटिनमवरील सीमा शुल्क- 6.4 टक्के (Union Budget 2024)
अमोनिअम नायट्रेटवरील सीमा शुल्क 7 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे.

नवीन कररचना काशी असणार?

3 लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री असणार आहे.
3 ते 7 लाख उत्पन्न – 5 टक्के आयकर
7 ते 10 लाख उत्पन्न- 10 टक्के आयकर
10 ते 12 लाख उत्पन्न – 15 टक्के आयकर
12 ते 15 लाख उत्पन्न – 20 टक्के आयकर
15 लाखांवर उत्पन्न – 30 टक्के आयकर (Union Budget 2024)

News Title –  Union Budget 2024 reduced Customs duty on gold

महत्त्वाच्या बातम्या-

आयकर प्रणालीत महत्वाचे बदल; तुम्हाला किती कर भरावा लागणार?

मोदी सरकारच्या बजेटमधील 10 महत्वाच्या घोषणा!

घराचं स्वप्न होणार साकार! मोदी सरकारची अफोर्डेबल हाउसिंग स्कीमवर मोठी घोषणा

कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा! अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची बजेटमध्ये मोठी घोषणा

मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?; वाचा सविस्तर